google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील राजकारणात आर पी आय ( आठवले ) पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार :- तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे

Breaking News

सांगोला तालुक्यातील राजकारणात आर पी आय ( आठवले ) पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार :- तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे

सांगोला तालुक्यातील राजकारणात आर पी आय ( आठवले ) पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार :-

 तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे

सांगोला तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघ व काही दिवसांपूर्वी सूतगिरणी च्या संचालक पदाच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन  बिनविरोध केल्या परंतु या निवडणुकीत संचालक म्हणून आंबेडकरी पक्षाला कोणत्याच राजकीय पक्षाने संधी दिली नाही.

 आर पी आय पक्षाच्या माध्यमातून गेली 15 ते 20 वर्ष तालुक्यातील सर्वच निवडणुकीत आम्ही शेतकरी पक्षास सत्ता मिळवून देण्यास निस्वार्थी व कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता  पक्षाच्या युतीच्या विरोधात जाऊन मदत केली.

 तरी शेतकरी कामगार पक्षाने सूतगिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत संचालक पदासाठी आर पी आय ला संधी दयायला हवी होती पण दिली नाही केवळ राजकीय मताच्या फायद्यासाठीच आर पी आय ( आठवले ) चा वापर करून घेतला जातो आणि पदे दयायची वेळ येते तेव्हा जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जाते.

 म्हणून भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आर पी आय ( आठवले ) गट कारकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना राजकीय पदे मिळवून देण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) तालुका अध्यक्ष व मा नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी दिला

Post a Comment

0 Comments