कोळे ता. सांगोला या ठिकाणी मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न....
कोळे / वार्ताहर..दि.09.02.2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर कोळे ता. सांगोला या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
ह्या महाआरोग्य शिबिरासाठी सांगोला तालुक्याचे दमदार पाणीदार आमदार.. मा.श्री.ॲड.. शहाजी (बापू) पाटील यांच्या हस्ते फीत कापून या महाआरोग्य शिबिराची सुरुवात झाली.
या शिबिरामध्ये गरोदर माता तपासणी,अती जोखमीच्या माता तपासणी, रक्त-लघवी तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, रक्ता मधील साखर तपासणी, प्रयोगशाळा तपासणी व औषधोपचार सदर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी युवक नेते सागर पाटील गुंडा दादा खटकाले सांगोला ....सोमनाथ यावलकर सांगोला नगरसेवक, सांगोला वैद्यकीय अधिकारी सीमा दोडामनी, समीर पाटील, दत्ता सरगर युवक नेते शिवाजी घेरडे,निलेश मदने सर, बिरा आलदर, तातोबा सरगर, माणिक आलदर, संभाजी गोडसे, शहाजी हातेकर, अकीब पटेल, अशोक आलदर,
धनाजी सरगर, विठ्ठल कोळेकर, 108 चे डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी व पायलट श्री.मारुती बाबर व मल्लु कोपें हा महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मोठे योगदान या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनेश मोहिते,
कनिष्ठ सहाय्यक दत्ता करांडे, फार्मासिस्ट गणेश लवटे सुपरवायझर पांडुरंग शिंदे, आरोग्य सेवक रावसाहेब बंडगर, व आशा वर्कर व नर्स सर्व स्टाफ यांचेकडून मोलाचे सहकार्य लाभले व कोळे येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments