...तर माणनदीवर ठिय्या आंदोलन करणार कडलास ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा रोड दुरुस्त नाही झाला
तर आम्ही सर्व गावकरी माणनदीवर ठिय्या आंदोलन करणार सांगोला तहसीलदार यांना निवेदन
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला - जत रोडवरील माण नदी जवळचा रस्ता खुप खराब झाला आहे. त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यापूर्वी आपणास निवेदन देऊन या समस्येकडे आपले लक्ष वेधले होते परंतू आम्हास एकाच प्रश्नावरती दोन-दोन वेळा निवेदन देऊन आंदोलनाची वेळ येत आहे ही बाबत खेदजनक वाटते.
येत्या १० दिवसामध्ये जर रोड दुरुस्त नाही झाला तर आम्ही सर्व गावकरी माणनदीवर ठिय्या आंदोलन करणार आहोत. आणि जोपर्यंत रस्ता दुरुस्ती चालू होत नाही तो पर्यंत आम्ही त्याठिकाणाहून अजिबात हटणार नाही.
तरी याची दखल घेवून संबंधीत ठेकेदारास आपण तश्या सुचना देवून सामान्य माणसांच्या सुरक्षतेच्या दृष्ठीकोनातुन उपाययोजना करावी अशा आशयाचे लेखी निवेदन कडलास ग्रामस्थांच्या वतीने मा.तहसीलदार श्री. अभिजित पाटील यांना देण्यात आले आहे.
यावेळी राहुल गायकवाड, दत्तात्रय टापरे, दत्तात्रय जाधव, विजय सुरवसे, आकाश ठोकळे, विजय गायकवाड, रोहित गायकवाड आदी उपस्थित होते.


0 Comments