सांगोला अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या
सांगोला तालुक्यातील सरकारी आरोग्य केंद्रातील व उप केंद्रातील प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी
आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे
सांगोला- गावगाड्यातील रुग्णांना प्राथमिक उपचार तात्काळ मिळावेत या उद्देशाने सुरू केलेल्या आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये अनेकदा डॉक्टर नसल्याचे सांगितले जाते. परिणामी अनेकदा गोरगरीब नागरिकांना जीवनमरणाशी झुंज द्यावी लागल्याच्यां घटना
घडल्या आहेत. डॉक्टर उपस्थित राहत नाहीत यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच त्यांना सामील असल्याच्या घटनेमुळे आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत.
यामुळे अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या सांगोला तालुक्यातील सरकारी आरोग्य केंद्रातील व उप केंद्रातील प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआयचेतालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी केली आहे.
सांगोला तालुक्यात आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये हजारो रुपये पगार देऊन शासनाने डॉक्टरांची नेमणूक केली आहेत. परंतु डॉक्टर अभावी अनेकदा आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र बंद असल्याचे सांगितले जाते. मुख्यद्वारावर कुलूप लावण्यात येते,
त्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास बसूनदेखील संबंधीत अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. आसपासच्या नागरिकांना विचारपूस केली असता या ठिकाणी डॉक्टर तसेच कर्मचारी कुठल्याही वेळेत ये-जा करत असल्याचे सांगितले जाते.
तालुक्याची ही परिस्थिती असून आरोग्य केंद्र बंदअसल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादा रुग्ण आला असता त्याच्या जिवाचे बरे वाईट झाले तर याला जबाबदार आरोग्य विभाग राहील असा इशारा देत,
मोठा खर्च करुन रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी हे सरकारी आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रात अनुपस्थित राहणान्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी केले.


0 Comments