Breaking News

ते गेले, तिचा विश्वासच बसेना, प्रेताला म्हणे उठा ना! वृद्धाची आत्महत्या : प्रसंग पाहून, रुग्ण, नातेवाईक सुन्न

  ते गेले, तिचा विश्वासच बसेना, प्रेताला म्हणे उठा ना! वृद्धाची आत्महत्या : प्रसंग पाहून, रुग्ण, नातेवाईक सुन्न


 पती पत्नी हे अतूट नाते अगदी सता जन्माचे म्हणतात तसे मरण हे विधी लिखित असत तारुण्यात लग्न झाले की आपल्या आपली जबाबदारी पार पाडत आपल्याच संसाराचा गडा दोघांच्या जोडीनेच ओढावा लागतो 

ती जोडी म्हणजे पती पत्नी अगदी तारुण्या पासून ते वृद्धापकळा पर्यत पण मधेच जर कोणी साथ सोडली की आभाळ कोसळलते अगदी अशीच मनाला सुन्न करणारी घटना आज अकोला सरोपचापर रुग्णाल्यात पाहायला मिळाली

‘अहो उठाना, बोला ना,’ असे पत्नी सतत म्हणत होती, त्यांना सारखी कुरवाळत होती. परंतु ते उठलेच नाहीत. डॉक्टरांनी सांगितले की, ते गेले तरी, तिचा विश्वास बसत नव्हता. ती सारखी मरण पावलेल्या पतीशी बोलत होती. हे दृश्य पाहून, सर्वोपचार रूग्णालयातील प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते.

खडकी भागातील माउली नगरात राहणारे सुरेश नगरनाईक (६१) यांनी सोमवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

ही बाब शेजारच्या नागरिकांना कळल्यावर त्यांनी तातडीने सुरेश नगरनाईक यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि ते मरण पावल्याचे सांगितले. परंतु तेथे उपस्थित पत्नीचा डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास बसेना, ती सारखी प्रेताला ‘अहो उठा ना, बोला ना,’ असे म्हणत होती. 

आता शरीरातून प्राण निघून गेल्यावर प्रेत बोलणार तरी कसे? हे तिला कळेना. खडकीतील सुरेश नगरनाईक यांचा दूध विक्रीचा व्यवसाय. गत काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Post a Comment

0 Comments