Breaking News

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात एसएससी निरोप समारंभ संपन्न

 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात एसएससी निरोप समारंभ संपन्न

दहावी परीक्षा ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही, परिणामाची चिंता करू नका :- प्रा.के एच चौगुले

सांगोला (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती प्रबळ असणे खूप महत्त्वाचे आहे प्रयत्न व चिकाटीने कोणतीही ध्येय साध्य करता येते विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तपकिरी शेटफळेचे उपसरपंच प्रा. के एच चौगुले यांनी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. 

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात एस एस सी मार्च 2022 -23 विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,सचिव नीलकंठ शिंदे ,अभिजीत कदम महाविद्यालयाचे प्रा. आलदर सर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी  संस्था प्रशाला याबद्दल असणारी कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली. सहशिक्षिका सुवर्णा इंगवले मॅडम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रा. आलदर सर यांनी माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेस तणाव मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात ,

हा टप्पा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे त्यामुळे या परीक्षा तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी द्याव्यात यश , अपयशाचा विचार करू नका स्वतःला शांत रिलॅक्स ठेवा .अभ्यासावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला आलदर सरांनी दिला.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ देऊन मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष कुंभार सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments