सांगोला लायन्स क्लब ग्रामीण भागातील सेवेचे साधन आमदार अॅड. शहाजी पाटील : आलेगाव येथे नेत्रतपासणी शिबिर
सांगोला : संपूर्ण जगाच्या पाठीवर काम करणारी सेवाभावी अशी सर्वात मोठी संस्था म्हणजे लायन्स क्लब आहे. या संस्थेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यामध्ये माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली गेले २५ वर्षे अतिशय चांगले व उत्कृष्ट कार्य सुरू आहे.
डोळ्यांचे प्रश्न हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतात. वयोवृद्ध माणसाला दूरच्या दवाखान्याला जाणे शक्य नाही. ती सोय लायन्स क्लबमुळे आलेगाव येथे डोळे तपासणी शिबिराच्या माध्यमातून गावातच होत आहे. त्यामुळे लायन्स लव ग्रामीण भागातील सेवेचे साधन आहे, असे प्रतिपादन आमदार अँड शहाज पाटील यांनी केले.
लापस क्लब सांगोला आयोजित गुणाई डेअरी व श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आलेगाव येथे मोफत डोळे तपासणी वमोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सरपंच नंदाबाई दिवसे, उपसरपंच राहुल ढोले, माजी सरपंच श्रीरंग बावर, कांबळे गुरुजी, सविता कांबळे, माजी नगराध्यक्ष ला. सुहास होनराव,
इंजि. ला. हरिदास कांबळे, गुणाई डेअरी चेअरमन सुमन कांबळे, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण ३५० पेक्षा जास्त रुग्णांची डोळे तपासणी झाली. आलेगाव येथील अशोकराव देसाई कृषी विद्यालयातील मुलांची डोळे तपासणी झाली.
या शिबिरासाठी उन्मेश आटपाडीकर, प्रा. नवनाथ बंडगर, अमोल महिमकर, सूर्यकांत कांबळे, प्रा. पी. जी. कांबळे, ग्रामपंचायत आलेगाव सदस्य, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments