Breaking News

मोठी बातमी! ठाकरे गटाचे सर्वच आमदार अपात्र होणार?

 मोठी बातमी! ठाकरे गटाचे सर्वच आमदार अपात्र होणार?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून विधीमंडळातील शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत आज शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अपात्र करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन हजार कोटी रुपयांची डील केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. 

याशिवाय शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हीप लागू केला जाणार आहे. 

या व्हीपचे पालन न करणाऱ्या आमदारांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचेही शिरसाट यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करत असून त्यांना अपात्र करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केल्याचेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments