google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक | मृत्यू झाल्याचं समजून ज्याचं केलं दफन, महिनाभरानं त्यानं केला बायकोला व्हिडीओ कॉल, पालघरमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Breaking News

धक्कादायक | मृत्यू झाल्याचं समजून ज्याचं केलं दफन, महिनाभरानं त्यानं केला बायकोला व्हिडीओ कॉल, पालघरमध्ये नेमकं घडलं तरी काय?

 धक्कादायक | मृत्यू झाल्याचं समजून ज्याचं केलं दफन, महिनाभरानं त्यानं केला

बायकोला व्हिडीओ कॉल, पालघरमध्ये नेमकं घडलं तरी काय? 

जी व्यक्ती महिनाभरापूर्वी मेली, असं समजून कुटुंबीय दु:खी झाले होते, त्यांनी व्यक्ती गेल्याचा दुखवटाही पाळला. तीच व्यक्ती जिवंत असल्याचं महिनाभरानं समोर आलंय.हा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला. त्याच्या ऐवजी दुसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांनी दफन केल्याचंही समोर आलंय.

पालघर : जी व्यक्ती महिनाभरापूर्वी मेली, असं समजून कुटुंबीय दु:खी झाले होते, त्यांनी व्यक्ती गेल्याचा दुखवटाही पाळला. तीच व्यक्ती जिवंत असल्याचं महिनाभरानं समोर आलंय. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात पालघमध्ये घडला. 

त्याच्याऐवजी दुसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांनी दफन केल्याचंही समोर आलंय. आता त्या दफन करण्यात आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांनी सुरु केलाय. हे सगळं कसं घडलं, याचाही शोध आता घेण्यात येतोय.

रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची अफवा

पालघरमध्ये राहणाऱ्या शेख कुटुंबीयातील एका व्यक्तीचा 19 जानेवारी रोजी रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्याच व्यक्तीनं जेव्हा 5 फेब्रुवारीला पत्नीला फोन केला, 

तेव्हा सगळे उडालेच. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह दफन केल्याचं समोर आलंय. आता पालघर रेल्वे पोलीस मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायेत.

पोलिसांनी काय सांगितलं?

9 जानेवारी रोजी रेल्वे रुळ ओलांडताना एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मित मृत्यूचा रिपोर्ट तयार केला. मृत व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी त्याचा फोटो वेबसाईट, सोशल मीडियावर टाकण्य़ात आला. हा फोटो पाहून पालघरमधील शेख कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क केला आणि ही त व्यक्ती 57 वर्षीय रफीक शेख असल्याचा दावा केला.

6 महिन्यापासून होता बेपत्ता

रफीक शेख घरगुती वादानंतर गेल्या 6 महिन्यांपासून बेपत्ता होता. केरळमध्ये असलेल्या त्याच्या पत्नीच्याही तो संपर्कात नव्हता. कुटुंबीयांनी मृत व्यक्ती ही रफीक असल्याचं समडून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. रफीकची पत्नी आणि भावानं मृतदेहाची ओळख पटवल्यानंतरच मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणंय.

5 फेब्रुवारीच्या फोननं सगळेच उडाले

या घटनेला महिना उलटल्यानंतर 5 फेब्रुवारीला रफीकच्या पत्नीला रफीकचा क़ॉल आला. त्यानं फोन करुन तिची आणि मुलांची चौकशी केली. तिला विश्वास बसत नसल्यानं तिनं रफीकला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितलं. जेव्हा रफिकनं व्हिडीओ कॉल केला, तेव्हा ती उडालीच. 

काहीतरी मोठी चूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. रफीक हा रिक्षाचालक आहे. घर सोडल्यानंतर तो डहाणूच्या एका आश्रमात काम करीत होता. आता मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

Post a Comment

0 Comments