सांगोला सहा गावच्या ग्रामपंचायतीमधील रिक्त जागेसाठी
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरु प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : २ मार्चपर्यंत हरकती घेता येणार
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील हलदहिवडी, नाझरे, सोनंद, गळवेवाडी, जवळा आणि डोंगरगाव अशा ६ ग्रामपंचायतीच्या ६ रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव या प्रवर्गातील गोदाबाई बडू कुंभार, बहारे प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील कल्पना लक्ष्मण चव्हाण,
सोनंद प्रभाग क्रमांक चारमधील सर्वसाधारणप्रवर्गातील राहुल विलास काशीद गळवेवाडी प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गातील स्वाती कुंडलिक गळवे प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वसाधारण राखीव मधील
रुक्मिणी अरुण सांळुखे आणि डोंगरगाव प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गातील श्री गणेश तातोबा गेजगे यांचे निधन झाल्याने एकूण ६ ग्रामपंचायत मधील ६ सदस्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे
निधन झालेल्या तसेच राजीनामा अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या जागांच्या तसेच सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियमातील तरतुदीनुसार पोटनिवडणुका विहित मुदत घेण्यासाठी ३१डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणामुळे रिक्त झालेल्या जागांची माहिती आयोगाच्या ५ जानेवारी २०२३ च्या पत्राने मागविण्यात आली होती.
त्यानुसार सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या ६ जागेसाठी सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबत शुक्रवार दिनांक २४ रोजी रिक्त जागेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर हरकती घेण्यात येणार आहे.
हरकतीसाठी शुक्रवार २४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत कालावधी असणार आहे. तर ९ मार्च २०२३ रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदार अभिजीत पाटील यांनी कळविले आहे.


0 Comments