google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम

Breaking News

सांगोला नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम

 सांगोला नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम

सांगोला /प्रतिनिधी – सांगोला नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात येत असून याकरता टास्क फोर्स ची नियुक्ती करण्यात आ लेली आहे.


 शहरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले थर्माकोल, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिक कॅरीबॅगज याचा वापर व्यापारी नागरिक यांनी करू नये. जे नागरिक, व्यापारी प्रतिबंधित प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर करतील अशा नागरिकांवर, व्यापाऱ्यावर शासनाने ठरवून दिलेली कारवाई करण्यात येईल.

सध्या शहरांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम, शहरांमध्ये घंटागाडीत कचरा न टाकता इतर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या वर नगर परिषदेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदी अंतर्गत शहरातील 89 दुकानांची तपासणी करण्यात आली

 त्यामधील दोन दुकानावर कारवाई करण्यात आली असून रक्कम रुपये 7400/-दंडा करण्यात आलेला आहे. सदर मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंत दीडशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या टीम मध्ये श्री गणेश गळीयल, निलेश कांबळे,

 अनिकेत चंदनशिवे, आशिष बनसोडे, प्रफुल्ल धनवडे, स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड हे कर्मचारी आहेत. नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी नागरिकांनी , व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिक थर्माकोल याचा वापर करू नये, तसेच शहर प्लास्टिक मुक्त ठेवावे असे आवाहन केलेले आहे.

Post a Comment

0 Comments