google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काळूबाळूवाडी ता. सांगोला येथे बोलेरो गाडीची दुचाकीस्वारास धडक, एकाचा जागीच मृत्यू

Breaking News

काळूबाळूवाडी ता. सांगोला येथे बोलेरो गाडीची दुचाकीस्वारास धडक, एकाचा जागीच मृत्यू

 काळूबाळूवाडी ता. सांगोला येथे बोलेरो गाडीची दुचाकीस्वारास धडक, एकाचा जागीच मृत्यू

 सांगोला / प्रतिनिधी मिरज (भिलवडी स्टेशन) येथून मजुरीसाठी आलेल्या डबलसीट दुचाकीस्वरास पाठीमागून आलेल्या बोलेरो जीपने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. 

ही घटना दि. २४ रोजी सकाळी ६. ५० वाजता हॉटेल सह्याद्री काळूबाळू वाडी (ता. सांगोला) येथे घडली असून पोलिसात अज्ञात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

 याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी जालिंदर जाधव यांचा चुलत भाऊ चंद्रकांत श्रीकांत जाधव (२८) रा. भिलवडी स्टेशन, ता पलुस जि सांगली व बाबुल रुपसेन गोसावी रा. बुधगाव ता. मिरज जि. सांगली असे दोघे मिळून मोटासायकल क्रमांक एम. एच. १० डी. एक्स. ८०५२ वरून मिरज हून सांगोल्याकडे येत होते. 

दरम्यान मिरज ते सांगोला येणारे रोडवर हॉटेल सह्याद्रीचे समोर काळुबावाडी ता. सांगोला येथे पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाची बुलेरो गाडीचे चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून रस्त्याच्या परस्थितीकडे दूर्लक्ष करीत मयत चंद्रकांत जाधव व बाबुल गोसावी यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

 यामध्ये चंद्रकांत जाधव याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मयत झाला तर सोबतचा बाबुल गोसावी हा देखील डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला.

 यावेळी अज्ञात बोलेरो चालक हा जखमिंची चौकशी न करता तेथून निघून गेला आहे. याबाबत मयत चंद्रकांत जाधव यांचा चुलत भाऊ जालिंदर जाधव याने अज्ञात बोलेरो चालका विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

Post a Comment

0 Comments