"फांजर" या आगामी चित्रपटात सांगोल्याची अभिनेत्री सायली कांबळेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण
सांगोला : "शिवानी फिल्मस" नूतन माने प्रस्तुत लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक 'श्रीद्त्त पांडुरंग माने' यांचा मराठी चित्रपट "स्पर्श" दिनाक 24 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
'स्पर्श' या चित्रपटात सांगोल्यातील अभिनेत्री सायली कांबळे हिने 'उर्मिची' प्रमुख भूमिका साकारली आहे. सदर कथानक हृदयस्पर्शी असून एका वेगळ्या विषयीची मांडणी केली आहे. अभिनेत्री सायली कांबळेच्या चित्रपट क्षेत्रातील पदार्पनामुळे सांगोला तालुक्याच्या लौकिकात भर पडली आहे.
प्रतिष्ठित समजल्या जाणार्या कुटुंबातील उर्मीच्या कपाळी अकाली वैधव्य येते. पुढे विधवाचे आयुष्य जगणाऱ्या उर्मीच्या आयुष्यात एका निस्वार्थी तरुणाच्या प्रेमाचे वळण येते आणि इथून तिच्या आयुष्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात होते.
जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकरासाठी सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जाऊन पुढे ती प्रेमासाठी बंड पुकारेल का ? शेवटी दोघे एकत्र येतील का ? जर दोघे एकत्र आले तर त्यांचे प्रेम यशस्वी होईल का ? याचे उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे.
अनेक भूमिका साकारल्या
अभिनेत्री सायली कांबळें हिने अनेक लघुपटात व चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. 'वळण' या लघुपटाबरोबरच 'जांभूळबेट' या चित्रपटात राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कलाकार 'हंसराज जगताप' टिंग्या चित्रपटातील शरद गोयेकर यांच्या समवेत भूमिका केली आहे. "निर्झरासृष्टी फिल्म्स" निर्मित व दिग्दर्शक देवदत्त धांडोरे यांच्या "फांजर" या आगामी चित्रपटात सायली कांबळे हिने भूमिका साकारली आहे.
शिक्षण घेत चित्रपट सृष्टीत पदार्पण
सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे दहावीचे शिक्षण घेतले असून अमोल महिमकर सरांच्या मार्गदर्शनात तिच्यातील कालगुणांना वाव मिळाला. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व जु. कॉलेज सांगोला येथे झाले. सध्या ती 'फिजिओथेरपी'चे शिक्षण घेत आहे.
अभिनेत्री सायली कांबळे हिला लहानपणापासून अभिनयाची व नृत्याची आवड आहे. सांगोला महाविद्यालायचे प्रा.डॉ.विधीन कांबळे यांची कन्या असून घरातील आई-वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांगल्या संस्कारामुळेती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी चित्रपट क्षेत्रातील जडण-घडणीमध्ये अनेकांचा वाटा आहे. 'स्पर्श' चित्रपटाचे निर्माते श्रीद्त्त माने यांनी अभिनेत्री सायली कांबळेची चित्रपटासाठी निवड करून तिला चित्रपट जगतात उतरवले हे फार कौतुकास्पद आहे.
हास्यसम्राट जितेश कोळी, कवी नागेश भोसले, चित्रपट निर्माता देवदत्त धांडोरे, चित्रपट अभिनेता दादासाहेब सावंत, दिग्दर्शक जगन्नाथ गोफणे, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त सतीश आढाळ्कर, चित्रपट निर्माते प्रशांत पाटील,
नौशाद मुलाणी, महादेव कांबळे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अभिनेत्री सायली कांबळेचेे वडील प्रा.डॉ. विधीन कांबळे यांनी माहिती दिली. अभिनेत्री सायली कांबळेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.



0 Comments