सांगोला तलाठी व मंडळ अधिकारी यांचे अडीअडचणी बाबत बेमुदत संप व सामुदायिक रजा आंदोलन सांगोला तहसीलदार यांना निवेदन
मेहरबान आपणास विनम्रपणे विनंती करण्यात येते की, वरील संदर्भाय विषयान्वये यापूर्वी आपणास सक्षम भेटून व आर. ओ. मिटिंगमध्ये चर्चा होऊन आपण संबंधित अधिकारी यांचा सूचना देऊठी मंडळाधिकारी व तलाठी यांचे अडीअडचणी सोडवले जात नाही.
या संबंधाने आम्ही आपणास दिनांक 25/01/2023 रोजी तलाठी मंडळाधिकारी यांचे अडीअडचणीबाबतचे निवेदन दिलेले जाते. यावर आज आखेर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही.
नाईलाजास्तव सोलापूर जिल्हा तलाठी संघाने सांगोला तालुका तलाठी संघ आज दिनांक 07/02/2023 पासून बेमुदत संप व सामुदायिक रजा आंदोलन करत आहेत तरी सर्व मंडाधिकारी व तलाठी यांची DSC व सामुदायिक रजेचे अर्ज आपणाकडे सुपूर्द करत आहोत याबाबतची संपूर्ण जबाबदारी तालुका प्रशासनाची राहील. ही विनंती.
वरील विषयानुसार विनंती करण्यात येते की, तलाठी व मंडलाधिकारी यांचे अडीअडवणी पुढील प्रमाणे.
1) प्रिंटर मिळणे बाबत :- गेली दोन वर्षांपूर्वी नवीन तलाठी यांना लॅपटॉप दिलेले आहेत. परंतु प्रिंटर स्कॅनरसह गेले दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. आपणाकडे तलाठी संघ याबाबत वारंवार प्रिंटर मिळण्याबाबत पाठपुरावा करत असून जिल्हा प्रशासन याची दखल घेत नाही.
दैनंदिन कामकाज करण्यासाठी तलाठी यांना प्रिंटर असणे आवश्यक आहे. तरी तलाठी व मंडळ अधिकारी यांना स्कैनरसह •मिळावेत कारण प्रिंटर नाहीत तर तलाठी काम करू शकत नाहीत.
2) तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालब्ध पदोन्नती मिळणे :- तलाठी व मंडळाधिकारी यांनी 1. 2. 3 कालब्ध पदोन्नती या केवळ गोपनीय अहवाल नाहीत म्हणून अद्याप पर्यंत दिलेली नाही.
गोपनीय अहवाल जतन करणेची जबाबदारी कार्यालयाची असून त्यासाठी कालबद्ध प्रलंबित ठेऊ नयेत तसेच एखाद्या वर्षाचा गोपनीय अहवाल नसेल तर पाठीमागील वर्ष आणि पुढील वर्षाच मार्क पाहन आवरेज मार्क देऊन कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव निर्गत करनेत यावेत ही विनंती
3) जिल्हा अंतर्गत बदली प्रशासनाच्या सुधारित जी. आर. प्रमाण जिल्हा अंतर्गत उपविभाग बदली पात्र तलाठी यांचे बदली प्रस्ताव प्रलंबित आहेत ते निर्गत करण्यात यावीत ही विनंती. उदाहरणार्थ:- श्री नटवे व श्रीमती मांटे मॅडम, तलाठी सांगोला
4) सब रजिस्टरकडून पाठवलेल्या नोंदी बाबत :- सब रजिस्टर कार्यालयामार्फत तलाठी यांचेकडे नोंदी हा चुकीच्या येतात. दस्ताप्रमाणे नोंदी काही वेळेस येत नाहीत, सागाईकतील नोंदी चुकीच्या येत आहेत,
20 गुंटे प्रमाणभूत क्षेत्र टाकून त्यामध्ये 5 ते 10 नावे टाकून तुकडे बंदीचा भंग करून येणारे दस्त सदर चुकीच्या नोंदी रद्द करण्याची किंवा परत पाठविण्याची सुविधा तलाठी स्तरावर मिळावी. तसेच मंडळ अधिकारी स्तरावर मुदत संपून प्रमाणित करणेसाठी उपलब्ध नोंदी बाबत बरोबर आहे किंवा कसे याबाबत निर्णय घेणेसाठी 5 दिवसाचा अवधी मिळावा ही विनंती.
(5) ई-पीक पाणी करणे बाबत सती करू नये शासनाने खातेदारांना स्वतः ई-पीक पाणी करणे बाबत शासनाने परिपत्रक काढलेले असून, ई-पिक पाणी करणे बाबत खाते खातेदारातूनच उदासीनता आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी यांना सदर योजनेचा प्रसार व जाहिरात करावी असे असताना तलाठी यांना स्वताच्या मोबाईलवरून चुकीच्या पद्धतीने कार्यालयात बसून किंवा त्यांचे डाटा ऑपरेटर यांचे
•मार्फत चुकीचे पद्धतीने ई-पीक पाहणी करणे बाबत सक्ती केली आहे. ती करु नये. असे चुकीचे पीक पाहणी झाले मुले काही भागात तलाठी यांचेवर गुन्हा नोंद झाले आहेत आणि कारण नसताना शेतकरी यांचा रोश पत्करावा लागत आहे
6) पी एम किसान योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करणे बाबत :- पी. एम. किसन योजनेचे कामकाज तलाठी यांनी पूर्ण केलेअसल्याने ती योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करावे व तसे आदेश आपले स्तरावरून जिल्हा कृषी अधिकारी यांना द्यावे
उदारणार्थ- कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहे व कृषी विभागाकडे योजना हस्तांतरित केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तलाठी येथून पुढे पी एम किसान योजनेचे काम करणार नाहीत व केलेल्या कामाचा मोबदल तलाठी यांना अद्याप पर्यंत मिळालेला नाही. मोबदला ताबडतोब देण्यात यावा अशी विनंती.
7)ई चावडी कामकाज बाबत :- ई चावडी कामकाजाबाबत तलाठी यांना कोणत्याही प्रकारची प्रशिक्षण दिलेली नाहीत. तरी ई चावडी कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. आणि विना प्रशिक्षण ई चावडीचे काम करनेवी सती करू नये. सक्ती करून काम करून घेतलेले चुका होणेची शक्यता असते आणि त्यास तलाठी यांना जबाबदार धरणेत येऊ नये ही विनंती
8) नियमित वेतन वेळेत मिळणेबाबत तलाठी व मंडळा अधिकारी यांचे मासिक वेतन ३ तारखेपर्यंत करण्याच्या सूचना आपले स्तरावरील तहसीलदारा यांना देण्यात यावी. माळशिरस, मंगळवेढा. सांगोला या तालुक्यात तलाठी व मंडळाधिकारी यांचे मासिक वेतन 2 ते 3 महिने नाही पगारासाठी अँड उपलब्ध नाही असे सांगितले जाते.
9) गेटा डेटा:- मेटा डेटा कामकाज जिल्हातील तलाठी यांना तहसील कार्यालयातून रेकॉर्ड स्कॅनिंगचे तपासणी करून प्रमाणपत्र देणे बाबत तगादा लावला जात आहे.
सदर रेकॉर्ड स्क्रैनिंगचे कामकाज अभिलेख कक्षाशी संलग्न, (जबाबदारी) असल्याने सदरचे कामकाज हे संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेण्यात यावे. सदरचे कामकाज जिल्हाधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी करणार नाहीत व सदस्याकामकाजावरती सोलापूर जिल्हा तलाठी संघ बहिष्कार टाकून • विनयपणे काम नाकारत आहे.
10 तलाठी व कोतवाल यांची सेवा वर्ग केले बाबत :- • जिल्ह्यातील काही तालुक्यातील तलाठी व कोतवाल यांची सेवा तहसीलदार व प्रांत कार्यालयात वर्ग केलेली असून त्यांच्या मूळ सजेवस्ती आदेश यावीत ही विनंती.
उदारणार्थ- दक्षिण सोलापूर येथील तलाठी उपविभागीय कार्यालयात वर्ग केले आहेत.
11) अतिवृष्टीचे पंचनामा व अनुदान वाटपाचा मोबदला मिळणेबाबत :- सन 2013-2014 या कालावधीमध्ये अतिवृष्टी झालेली होती. सदर अनुदान वाटपाचे कामकाज सोलापूर जिल्ह्यातील तलाठी यांनी अतिवृष्टी पंचनामे, पिकाची फोटो काढणे, दाखला तयार करणे, बाबत तलाठी यांना कार्यालईन खर्च करावा लागत असतो.
सदर योजनेच्या वाटपाबाबत शासन स्तरावर 0.05 प्रमाणे आर्थिक तरतूद करून तलाठी यांना आर्थिक मोबदला जिल्ह्यामध्ये देण्यात आला परंतु अक्कलकोट, उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील तहसीलदार यांनी तलाठी यांना मोबदला दिला नाही
तलाठी संघाने वारंवार पाठपुरावा करूनही याचा विचार अद्याप जिल्हा प्रशासन करीत नाही. संबंधित तहसिलदार यांना जिल्हा प्रशासन पाठीशी घालत आहे अशी जिल्हा संघातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर येथील तलाठी यांची धारणा झालेली आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे करून वेळोवेळी सादर केले जात असतात त्यासाठी ही तलाठी कार्यालयास कार्यालईन खर्चासाठी आर्थिक तरतूद करनेत यावी ही विनंती
12) रिक तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल पदभरती:- सांगोला तालुक्यात तलाठी 18 पदे, कोतवाल 20 प्रदे, मंडळ अधिकारी "पद रिक्त आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून तलाठी मंडळ अधिकारी यांची अतिरिक्त कामामुळे आरोग्य बिघडत आहे आणि कामाची प्रत ढासळत आहे तरी सुंदर ची रिक्त पदे तात्काळ भरावीत ही नम्र विनंती.
13) वैद्यकीय व फरकाची बिले प्रलंबित :- सांगोला तालुक्याम वैद्यकीय बिले, कालबद्ध फरकाची बिले अँट नसलेने वर्षण वर्ष प्रलंबीत आहेत तरी त्यासाठी निधि उपलब्ध करून ती तत्काळ अदा करनेत यावित ही विनंती.
14) किर्ती उपलब्ध होणेबाबत :- आता बिगरशेती, अनाधिकृत बिगरशेती तसेच शिक्षण कर वसूल सुरू असून त्यासाठी वेळेवर व पुरेशा किर्दी उपलब्ध व्हाव्यात ही विनंती
15) मंडळ अधिकारी पदोन्नती :- साजा आणि मंडळ पुनर्रचना झालेनंतर नवीन निर्मित 19 मंडळ अधिकारी पूढे व रिक मंडळ अधिकारी पदे तत्काळ पदोन्नतीने भरनेत यावीत ही विनंती. राज्यातील परभणी, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यानी या पूर्वीच पदे भरली आहेत.
असे पदोन्नती मागे पुढे होणेमुळे मंडळ अधिकारी यांची नायब तहसिलदार पदासाठीची सेवा जेष्टता पाठीमागे जाऊन खूप मोठे व भरून न येणारे नुकसान होणार आहे तरी तत्काळ पदोन्नती करणेत यावी ही विनंती.
मेहरबान आपणास विनम्रपणे विनंती करण्यात येते की, वरील अडीअडचणी याबाबत यापूर्वी आपणास सक्षम भेटून व आर.ओ. च्या मिटिंगमध्ये चर्चा होऊन आपण संबंधित अधिकारी यांना सूचना देऊनही तलाठी यांचे अडीअडचणी सोडवले जात नाही.
नाविलाजास्तव सोलापूर जिल्हा तलाठी संघ दिनांक 07/02/2023 पासून सोलापूर जिल्ह्यातील तदनुषंगाने सांगोला तालुक्यातील तलाठी सामुदायिक रजा आंदोलनकरणार असून याची पूर्व जबाबदारी तालुका प्रशासनाची राहील. ही नम्र
विनंती.


0 Comments