आता तीर्थयात्रेसाठी ज्येष्ठ नागरिकांना विमानाने जात येणार, सरकारचा मोठा निर्णय
गेल्या काही दिवसापासून दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल हे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जात आहेत. अरविंद केजरीवाल ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने घेऊन जात आहेत.
एक विशिष्ट पात्रता असणारे नागरिकांना हा लाभ दिला जातो. आता मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही नवीन घोषणा केली आहे त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रेला विमानाने प्रवास करून देण्याचा निर्णय घेतला आहे
मध्यप्रदेश मधून नागरिकांना मार्च महिन्यामध्ये तीर्थयात्रा घडून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री संत रविदास जयंती यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या ठिकाणच्या विकास कामावर विशेष भर दिला
सरकारी योजनेमध्ये संत रविदास यांच्या जन्म ठिकाणचे क्षेत्र समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विमानाने प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सरकार हा खर्च करणार असल्याचेही घोषणा केली. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण चेकअप केली जाईल. नंतरच विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
सरकारने काढलेल्या या योजनेअंतर्गत साठ वर्षाच्या वरील कोणत्याही नागरिकास कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाता येणार आहे. यावेळी शिवराज चव्हाण म्हणाले की सर्वच वार्डातील नागरिक हे तीर्थक्षेसाठी पात्र असतील.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक योजनांच भूमिपूजन देखील केले आहे. आता उन्हाळ्यामध्ये अनेक राज्यांमध्ये यात्रा चालू होतील. त्यामुळे इतर राज्यातून होईल अशा मागणी केल्या जाऊ शकतात.


0 Comments