google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

Breaking News

बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा;

नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. तर, आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाही. कारण त्यांची प्रकृती चांगली नाहीए, असं पटोले म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत थोरात यांची निष्क्रियता तसंच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरात यांचं विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत होतं.

 पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर त्यांच्याकडे पक्षनेते पद ठेवयाचं का यावर निर्णय होणार होता. पण त्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

Post a Comment

0 Comments