google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! आठ वर्षीय मुलीस कर्नाटक बसने ठोकरल्याने जागीच मृत्यू; दोन दिवसात याच मार्गावर दोन अपघात दोन मुलींचा गेला जीव

Breaking News

ब्रेकिंग! आठ वर्षीय मुलीस कर्नाटक बसने ठोकरल्याने जागीच मृत्यू; दोन दिवसात याच मार्गावर दोन अपघात दोन मुलींचा गेला जीव

 ब्रेकिंग! आठ वर्षीय मुलीस कर्नाटक बसने ठोकरल्याने जागीच मृत्यू;

दोन दिवसात याच मार्गावर दोन अपघात दोन मुलींचा गेला जीव 

हौदातील पाणी आणावयास गेलेल्या 8 वर्षीय मुलीस रोड क्रॉस करताना कर्नाटक बसने समोरुन जोराने धडक दिल्याने जखमी होवून ती जागीच मयत झाली.

ही घटना दि.10 रोजी दुपारी 1.45 वाजता मंगळवेढा-चडचण मार्गावरील माऊली एच.पी.पेट्रोल पंपाजवळ घडली असून या प्रकरणी एस.टी.चालक हनमप्पा बसाप्पा तुराडगी (रा.हरिंदर जि.विजापूर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी विलास जोगराना (मुळगाव गुजरात,सध्या मंगळवेढा) हे आवताडे शुगर मिल नंदूर येथे नोकरीस असून दि.10 रोजी दुपारी 1.45 वाजता

फिर्यादीची बहिण कुंकू व तिची लहान मुलगी तथा मयत शेजल (वय 8) हे राहत्या ठिकाणापासून रोडच्या पलिकडे माऊली एच.पी.पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदाकडे पाणी आणण्यासाठी गेले होते.

पाणी भरुन घेवून माय-लेकी रोड क्रॉस करुन येत असताना मंगळवेढ्याकडून चडचणकडे जाणारी कर्नाटक एस.टी.बस क्रमांक के.ए.28 एफ -2122 वरील चालक तथा आरोपी हनमप्पा तुराडगी याने

त्याच्या ताब्यातील बस वेगात व निष्काळजीपणे चालवून शेजल हिस समोरुन जोराची धडक दिल्याने ती खाली पडल्यावर तिचे पायावरुन एस.टी.चे ड्रायव्हर साइडचे पाठीमागील चाक घालून जखमी करुन

तिच्या मरणास कारणीभूत ठरला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत असून पोलीसांनी कर्नाटक एस.टी.बस जप्त केली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात या मार्गावर दोन अपघात होवून दोन मुलींचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments