दुर्दैवी ! वडिलांच्याच कार खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू
लोणावळ्यात हॉटेल ऑर्चिडमध्ये कार पार्क करत असताना एका तीन वर्षांच्या मुलाचा आपल्याच वाडिलांच्या गाडी खाली आल्याने मृत्यू झाला आहे.
किआंश किरण माने (वय ३ वर्ष, रा. चिखली) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या चिमूकल्याचे नाव आहे. किरण माने (वय २८, रा- चिखली) असे या दुर्घटनेतील वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी दिपक शिवाजी वारंगुळे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. लोणावळा येथील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ हॉटेल ऑर्चिड आहे. या हॉटेल समोरील पार्किंगमध्ये किरण हे त्यांची कार पार्क करत होते. यावेळी त्यांचा मुलगा किआंश खेळत होता. ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे गाडीचे चाक हे किआंशच्या अंगावरून गेले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.


0 Comments