रेल्वे प्रशासनाविरोध प्रजासत्ताक दिनी निषेध आंदोलन
कलबुर्गी -कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस थांबा न दिल्याच्या निषेधार्थ कामटे संघटनेचे आंदोलन
सांगोला (प्रतिनिधी)कलबुर्गी -कोल्हापूर -कलबुर्गी या रेल्वेस सांगोला येथे थांबा न दिल्याचे निषेधार्थ रेल रोको ,निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या 5 महिन्यांपासून अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना रेल्वे मंत्रालय दिल्ली, महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर यांना चार वेळा निवेदन ,स्मरणपत्र दिले असून त्याची त्यांनी कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. सांगोल्यातील बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनी निषेध आंदोलन
,रेल रोको सकाळी दहा वाजता सांगोला रेल्वे स्टेशन येथे करण्यात येणार असल्याची माहिती शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने देण्यात आली तर या मागणीस पाठिंबाकरिता शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments