google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. ना. सुशील कुमार शिंदे साहेब यांचे विद्यमान काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांना काँग्रेस पक्षाचे काम करण्याच्या सूचना

Breaking News

मा. ना. सुशील कुमार शिंदे साहेब यांचे विद्यमान काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांना काँग्रेस पक्षाचे काम करण्याच्या सूचना

 मा. ना. सुशील कुमार शिंदे साहेब यांचे विद्यमान काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांना काँग्रेस पक्षाचे काम करण्याच्या सूचना

सांगोला/वृत्तवेध :मा. ना. सुशील कुमार शिंदे साहेब यांचे विद्यमान काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांना काँग्रेस पक्षाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे नव्याने शिफारस केलेल्या तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्रे न देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिले आहेत. 

काल माजी केंद्रीय मंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब सोलापूर येथे आले असता त्यांच्याबरोबर मंगळवेढा तालुका अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, सांगोला तालुका अध्यक्ष सुनील भोरे सर, मोहोळ तालुका अध्यक्ष सुरेश शिवपूजे, माढा तालुका अध्यक्ष सौदागर जाधव, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे,

 शहराध्यक्ष चेतन भाऊ नरुटे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार यांनी सुशील कुमार शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सुशील कुमार शिंदे साहेब यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विद्यमान तालुका अध्यक्षांना पक्षाचे काम व प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments