google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी, जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

Breaking News

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी, जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

 पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी, जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट 

मुंबई : भाजपनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2018 मध्ये पहाटेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. 

त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली एखादी खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी वक्तव्ये केली त्याला फार महत्त्व आहे, असं मला वाटत नाही. 

त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केलं. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार गेले म्हणून सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही.”

जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मी कदाचित शब्द वापरला होता. भाजपाकडे राष्ट्रवादीचा कल आहे अशी टिप्पणी कोणीतरी केली होती. त्याला देण्यात आलेली ही प्रतिक्रिया होती.

 त्यामुळे शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ते कसं आणि काय झालं हे माहिती नाही. पण शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ झाला,” असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.

 हा शपथविधी कोणीतरी जाणीवपूर्वक केला असं मला म्हणायचं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं. शपथविधीचे अनेक लोकांनी वेगळे अर्थ काढले. पण तशी वस्तुस्थिती नव्हती. शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली आणि आमचं सरकार स्थापन होण्यात मदत झाली हे मात्र खरं आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments