google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे युवांश क्लिनिकचे उद्घाटन...

Breaking News

सांगोला येथे युवांश क्लिनिकचे उद्घाटन...

सांगोला येथे युवांश क्लिनिकचे उद्घाटन...

 सांगोला येथील डॉक्टर यशोदीप बाबुराव गायकवाड व डॉक्टर पूजा यशोदीप गायकवाड यांच्या युवांश क्लिनिक चे उद्घाटन दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी डॉ.राम साळे, 

माजी विधानसभा सदस्य,डॉ. प्रभाकर माळी, चेअरमन सांगोला सहकारी सूतगिरणी, शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 यावेळी सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.धनंजय काटकर, डॉ. हनुमंत गावडे, डॉ.शिवराज भोसले, डॉ. शिवाजीराव ढोबळे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर डॉरणजीत केळकर इत्यादी डॉक्टर्स उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.यशोदीप गायकवाड यांनी या क्लिनिकच्या माध्यमातू न सांगोला तालुक्यातील लोकांना हृदय रोग, मधुमेह, मेंदूविकार तसेच इतर आजारावरती चांगले उपचार उ पलब्ध करून दिले जातील

 अशी ग्वाही दिली तसेच येणा या काळामध्ये सांगोला तालुक्याची गरज ओळखून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी डॉ. राम साळे व डॉ.प्रभाकर माळी यांच्या हस्ते डॉक्टर दांपत्य डॉ.यशोदीप व डॉ.पूजा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.यशराजे साळुंखे-पाटील चेतनसिंह केदार,शिवाजीराव गायकवाड, ऍड. उदय घोंगडे,

प्रभाकर चांदणे, डॉ. शिवाजीराव ढोबळे, डॉ.मच्छिंद्र सोनलकर यांनी आपल्या मनोगतातून डॉ.यशोदीप गायकवाड यांना शुभेच्छा

 दिल्या.प्रभाकर माळी बोलताना म्हणाले की श्री.बाबुराव गायकवाड यांच्या संस्कारात वाढलेले डॉ.यशोदीप गायकवाड हे रुग्णांना चांगली सेवा देऊन भाऊंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवतील.

 प्रमुख पाहुणे डॉ. राम साळे यांनी डॉ. यशोदीप व डॉ.पूजा गायकवाड यांना शुभेच्छा देऊन सांगोला तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा सल्ला दिला. 

कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार श्री.बाबुराव गायकवाड व महादेव गायकवाड यांनी केला.पूजा गायकवाड यांना शुभेच्छा देऊन सांगोला तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा सल्ला दिला.

 कार्यक्रमासाठी उप स्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार श्री.बाबुराव गायकवाड व महादेव गायकवाड यांनी केला.

यावेळी सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थित राहून डॉ.यशोदीप गायकवाड व पूजा गायकवाड यांना त्यांनी सुरु केलेल्या वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments