आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निधीतून वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयास संगणक , साहित्य प्राप्त
सांगोला (प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला ही शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारार्थ सन 1986 सालि स्थापन करण्यात आली .
सदर संस्थेचे कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय ही माध्यमिक शाळा 1986 पासून शासनमान्यतेसह चालू आहे .सध्या माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत सांगोला शहर व परिसरात एकमेव व कन्या प्रशाला आहे,
विद्यार्थिनींना संगणक शिक्षण आवश्यक होते सध्या शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी संगणक उपलब्ध होते त्या संगणकावर सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेणे शक्य नव्हते ही गरज ओळखून सांगोला तालुक्याचे आमदार ऍडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या
आमदार निधीतून तीन लक्ष रुपये मंजूर करून निधीतून एलसीडी प्रोजेक्टर ,संगणक संच, प्रिंटर ,स्कॅनर, झेरॉक्स मशीन हे साहित्य प्राप्त झाल्याची माहिती मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी दिली . त्याबद्दल प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले .
चौकट :- विज्ञान माहिती व तंत्रज्ञान मधील शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे प्रशालेतील शिक्षणास मोठा हातभार लागणार आहे अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त करुन विविध क्षेत्रात प्रवेश करतील ,
आजच्या बदलत्या शिक्षण प्रवाहात सामर्थ्याने कार्य करू शकतील असा संस्थेला विश्वास आहे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून आमच्या शाळेत संगणक , प्रिंटर, एलसीडी प्रोजेक्टर मंजूर करून प्रदान केल्यामुळे संस्था त्याचा पुरेपूर लाभ विद्यार्थिनींना उपलब्ध करून देईल .
श्री.नीलकंठ शिंदे, सर सचिव :-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला


0 Comments