google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

Breaking News

ब्रेकिंग! कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

 ब्रेकिंग! कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर आले असता त्यावेळी कोश्यारींनी राज्यपालपद सोडून उर्वरीत आयुष्यात चिंतन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

आता राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार, 

याची चर्चा सुरू झालेली असतानाच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदरसिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

परंतु आता कॅप्टन अमरिंदरसिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कोश्यारी यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर मोदी यांच्याकडे राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून कोश्यारी यांना कोणत्याही क्षणी राज्यपालपदावरून दूर केले जाण्याची शक्यत आहे. आता कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करत त्यांचे राजकीय पूनवर्सन केले जाण्याची शक्यता आहे. 

भाजप नेत्या सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल होणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी अमरिंदरसिंग यांचे नाव समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments