google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला वाकीशिवणे ग्रामपंचायतीचा उपक्रम : आम्रवृक्ष भेट देऊन महिलांचा सत्कार जुन्या विचाराच्या शृखला तोडून महिलांचा सन्मान करा- पो. नि. अनंत कुलकर्णी

Breaking News

सांगोला वाकीशिवणे ग्रामपंचायतीचा उपक्रम : आम्रवृक्ष भेट देऊन महिलांचा सत्कार जुन्या विचाराच्या शृखला तोडून महिलांचा सन्मान करा- पो. नि. अनंत कुलकर्णी

सांगोला वाकीशिवणे ग्रामपंचायतीचा उपक्रम : आम्रवृक्ष भेट देऊन महिलांचा सत्कार जुन्या विचाराच्या शृखला तोडून महिलांचा सन्मान करा- पो. नि. अनंत कुलकर्णी

 शिवणे गावानं ठरवलं अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्याचं; चक्क ५६ विधवांना दिले सोन्याचं मणी मंगळसूत्र

शिवणे (वार्ताहर)- शिक्षण विभाग पुणे, शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे व ग्रामपंचायत बाकी (शिवणे) ता. सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर कॉलेजमधील विद्याथ्यांचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे बाकी (शिवणे) ता. सांगोला येथे सुरू असुन दि. १२/०९/२०२३ रोजी आरोग्य शिबीर व महिला मेळावा, अनिष्ठ विधवा प्रथा निर्मूलन व राष्ट्रीय सेवा योजना शिबीर समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक श्री. अनंत कुलकर्णी होते. यावेळी अस्मा अतार, लतादेवी बोराडे, भामाबाई कांबळे, सविता दुधभाते, डॉ. निकिता देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 प्रमुख पाहूणे तहसिलदार श्री. तुषार शिंदे यांनी असा कार्यक्रम तालुक्यातील पहिला कार्यक्रम असून अत्यंत उत्कृष्ट नियोजन केल्याचे म्हटले या कार्यक्रमालाशुभेच्छा दिल्या.

पो.नि. अनंत कुलकर्णी म्हणाले की, महापुरुषांनी समाज सुधारण्याचे केलेले कार्य म्हत्वाचे असून महिला सक्षमीकरण करून मिची भिंत पाडून टाका. विधवांना समाजात सन्मान दिला पाहिजे वाची सुरवात बाकी गावातून झाली आहे.

 बासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे तर पुरुषांनी त्यांना मदत केली पाहिजे. सुरुवातीला विरोध होईल परंतु पुढे समाज मान्यता मिळेल. जग खूप सुंदर आहे आता सामाजिक परिवर्तनाला सुरवात झाली असुन आमच्याकडून आवश्यक ती मदत केली जाईल असे सांगीतले.

यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीही साजरी करण्यात आली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व विद्याथ्र्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील ५१ विधवा महिलांना सोन्याची मंगळसूत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सभापती श्री. बाळासाहेब काटकर, ग्रामसेवक शहाजीराव इंगवले,

 प्राचार्य विजयकुमार वाघमोडे, डॉ. अविनाश खांडेकर, डॉ. कल्याण ढाळे, नायब तहसीलदार बसवंत कोळी, विकास काळुंखे, सरपंच श्रीमती पार्वती आलदर, उपसरपंच सौ. कौसाबाई खिलारे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी, 

शिवणे कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, प्रकल्प प्रमुख प्रा. विठ्ठल क्लेकर, गावातील नागरिक, एन. एस. एस. मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब काटकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शोभनतारा मेटकरी व भारत मेटकरी गुरुजी यानी केले व प्रा. कामदेव खरात यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments