शेतकरी कामगार पक्ष सांगोला विधानसभा मतदारसंघ महीला आघाडीच्या संकल्पनेतुन होम मिनिस्टर व हळदी कुंकू समारंभ
सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व महिलांना कळविण्यात आनंद होतो की...
होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल व सामाजीक ऐंक्याची भावना निर्माण होईल......
शेतकरी कामगार पक्ष सांगोला विधानसभा मतदार संघ महिला आघाडीच्या प्रयत्नाने त्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पंचायत समिती गटांमध्ये फक्त महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
महिलांवरती कुटुंबाची विशेष जबाबदारी आसते...मुलांची जबाबदारी...स्वयपाकांची जबाबदारी..पाहुण्यांची जबाबदारी असते तसेच शेतीच्या ,व्यवसायाच्या व इतरही कामांमध्ये महिलांचा हातभार आसतो...या त्यांच्या दैनंदिन धक्का धक्कीच्या दिनक्रियेतुन महिलांना थोडीशी उसंत मिळावी..विशेषता महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा..करमणुक व्हावी...व सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे
या हेतुने शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या मार्गदर्शनाखाली... शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे...पहिलाच कार्यक्रम घेरडी गावामध्ये शनिवार दि.28/1/2023 रोजी होत आसुन....
विशेषता महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी आकर्षक भेटवस्तू देण्याचाही संकल्प आहे.तरी महिलांनी आपापल्या भागातील आयोजीत केलेल्या होम मिनिस्टर व हळदी समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी हि विनंती...
चंद्रकांत सरतापे प्रसिद्धी प्रमुख शेकाप


0 Comments