google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अदिराज अबॅकस क्लासचे नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश अदिराज कोळसे देशात पहिला तर श्रेया मुंडे देशात दुसरी

Breaking News

अदिराज अबॅकस क्लासचे नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश अदिराज कोळसे देशात पहिला तर श्रेया मुंडे देशात दुसरी

 अदिराज अबॅकस क्लासचे नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश अदिराज कोळसे देशात पहिला तर श्रेया मुंडे देशात दुसरी

सांगोला  :- मेट्रो ब्रेन अबॅकस संचलित 5 वी नॅशनल लेवल अबॅकस परीक्षा २२ जानेवारी २०२३ रोजी नांदेड या ठिकाणी घेण्यात आली. या स्पर्धेत सांगोला येथील अदिराज अबॅकस क्लासचा विद्यार्थी कु. अदिराज अनिल कोळसे पाटील याने देशात

 पहिला (वय वर्ष ५ ते ६) क्रमांक मिळविला. त्याला Topper of the topper हा अवॉर्ड ही मिळाला.तसेच श्रेया उमेश मुंडे हिने D level मध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत देशभरातून १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

 क्लासेसच्या संचालिका दिपाली कोळसे पाटील मॅडम यांना Best Franchise Top Of The Year 2023 Award देण्यात आला.

या स्पर्धेत १५ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळविले. गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थी पुढीप्रमाणे - अदिराज कोळसे पाटील,विहान पवार, स्माही घोंगडे, आरव लांडगे,सक्षम बंडगर, सार्थक सुरवसे, आयुष कोळेकर ,रितेश राजवाडे, युगंधरा.  देशमुख, श्रेया मुंडे, श्रुती माळी, आर्या भद्रशेट्टी, ओवी तारळेकर, दिव्या कोरे, राधेय क्षीरसागर.

 सर्व यशस्वी विद्यार्थ्याना मेट्रो ब्रेन अबॅकसचे डायरेक्टर संतोष लोहारे सर, सीमा लोहारे मॅडम, मराठी सिने अभिनेता प्रथमेश परब,अहमद देशमुख, अभिनेत्री मेघा शिंदे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी,प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अदिराज अबॅकस क्लासच्या संचालिका दिपाली कोळसे पाटील मॅडम यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments