ब्रेकिंग! तिरुपतीला जाताना सोलापुरातील तरुणांचा भीषण अपघात
बुधवारी तवेरा कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सोलापुरातील चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.
महाराष्ट्रातील सोलापूर येथील नऊ जणांचा जथ्था तिरुमला येथे दर्शन घेऊन कानिपकमकडे जात असताना हा अपघात झाला. ऋषिकेश, मयूर, अजय, रोहन अशी मृतांची नावे आहेत.
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. सविस्तर बातमी लवकरच


0 Comments