google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिकमहुद (ता. सांगोला) गावात सायकलीस कार अविचारीने व भरधाव वेगाने धडक सायकलस्वाराचा मृत्यू

Breaking News

चिकमहुद (ता. सांगोला) गावात सायकलीस कार अविचारीने व भरधाव वेगाने धडक सायकलस्वाराचा मृत्यू

 चिकमहुद (ता. सांगोला) गावात  सायकलीस कार अविचारीने व भरधाव वेगाने धडक सायकलस्वाराचा मृत्यू 

सांगोला  कारने सायकलीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर ते आटपाडी जाणाऱ्या रोडवरील

 चिकमहुद (ता. सांगोला) गावातील चौकात व्यापारी संकुलासमोर घडला आहे. हा अपघात 23 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजणेच्या सुमारास घडला.

   फिर्यादी विनायक विश्वनाथ माने (रा. महुद बु. ता. सांगोला) यांचे चुलते श्रीनिवास गंगाधर माने हे 23 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार

 बनवून सायकलीवरून शेतात येत असताना पंढरपूर ते आटपाडी जाणाऱ्या रोडवरील चिकमहुद चौकातील व्यापारी संकुल समोर आले असता पंढरपूरकडून येणारी कार

 (क्रमांक - एम. एच - 13, डी. एम - 89 95) वरील चालक अविनाश प्रभाकर टेके (रा. करकंब, ता. पंढरपूर) यांनी कार अविचारीने व भरधाव वेगाने चालवून श्रीनिवास माने यांच्या सायकलीस पाठीमागून जोराची धडक दिली. 

त्यात ते गंभीर जखमी झाले 24 जानेवारी रोजी पहाटे एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास उपचारादरम्यान श्रीनिवास माने यांचे निधन झाले. याबाबतची फिर्याद विनायक विश्वनाथ माने यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments