google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विटा बानुरगड-कोळा एसटी विस्तारित बस सुरू..? कोळा ग्रामस्थांकडून एसटी बसचे जल्लोषात स्वागत

Breaking News

विटा बानुरगड-कोळा एसटी विस्तारित बस सुरू..? कोळा ग्रामस्थांकडून एसटी बसचे जल्लोषात स्वागत

 विटा बानुरगड-कोळा एसटी विस्तारित बस सुरू..? कोळा ग्रामस्थांकडून एसटी बसचे जल्लोषात स्वागत 

कोळा वार्ताहर सांगोला तालुक्यातील कोळा परिसरातील ग्रामस्थांची प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली यांच्याकडून विटा आगाराची विटा बानुरगड-कोळा एसटी बस विस्तारित करून आज बुधवारपासून सुरू झाली आहे. विटा ते कोळा एसटीचे कोळा गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रथमच एसटी बस घेऊन येण्याचा मान एसटी ड्रायव्हर    

 व कंडक्टर   यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून उपसरपंच सादिक पटेल चेअरमन सुभाष कोळेकर माजी सेवानिवृत्त डीसीसी बँकेचे अधिकारी नौशाद तांबोळी व पत्रकार जगदीश कुलकर्णी यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला यावेळी सर्व नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित होते.

विटा आगारातून दररोज सकाळी विटा बानुरगड-कोळा ८ वाजता व दुपारी २ वाजता सुटणार आहे व कोळा गावातून विट्याकडे दररोज सकाळी ९.३० वाजता व दुपारी ३.३० वाजता विटा बानुरगड-कोळा रवाना होणार आहे असे विटा आगाराकडून सांगण्यात आले. विटा बानुरगड-कोळा विस्तारित केलेला एसटीचा मार्ग पुढील प्रमाणे आहे कोळा बहिर्जी नाईक समाधी स्थळ असलेले बानुरगड ते ताडाचीवाडी थंड हवेचे

 ठिकाण असलेले शुक्राचार्य तसेच पळशी हिवरे भिवघाट बेनापुर फाटा सुलतानगादे, तामखडी रेवणगाव रेनावी रेवणसिद्ध मंदिर व विटा असा एसटी मार्ग असणार आहे या भागातील प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रवास करून एसटी महामंडळ सहकार्य करावे असे आवाहन कोळा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.

विटा बानुरगड-कोळा एसटी बस सुरू एसटी बस सुरू करण्यासाठी सांगली परिवहन महामंडळाचे अंकुश सरगर विटा आगार प्रमुख उदय पवार सेवानिवृत्त एसटी अधिकारी बटू माळी सत्यवान हातेकर कोळा ग्रामपंचायतचे

 सरपंच सौ राजश्री सरगर उपसरपंच सादिक पटेल लोकप्रिय ग्रामविकास अधिकारी जयवंत लवटे भाऊसाहेब बानुरगडचे सरपंच सज्जन बाबर युवा नेते रोहित गायकवाड प्रमोद पोरे अनिकेत पोरे सतिश क्षीरसागर बाटू पोरे,बाजी मदने,समाधान सूर्यवंशी मेजर खंडागळे ज्ञानेश्वर खंडागळे यांचे विशेष सहकार्य लाभले.  

 विटा बानुरगड-कोळा एसटी बस विस्तारित करण्यासाठी विशेष प्रयत्न सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी नौशाद तांबोळी पत्रकार जगदीश कुलकर्णी यांनी केले. एसटीबस सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.

चौकट.

विटा बानुरगड कोळा विस्तारित बस सुरू झाली असून या मार्गावर बानुरगड येथे असलेले बहिर्जी नाईक समाधी स्थळ तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शुक्राचार्य देवस्थान शुक्राचार्य येथे त्याच प्रमाणे रेणावी येथे रेवनसिद्ध मंदिर जाण्यासाठी प्रवाशांची सोय झाली आहे जास्तीत जास्त प्रवास करून सहकार्य करावे.

~ नौशाद तांबोळी

कोळा 

चौकट...

कोळा गावातून डायरेक्ट विटा येथे जाण्यासाठी पूर्वी एक एसटी बस नव्हती विटा कोळे एसटी बस मुळे प्रवाशांची  विटा कराड सातारा पुणे मुंबई कडे प्रवास करणारे लोकांची चांगली सोय झाली आहे एस टी महामंडळस सहकार्य करावे..

 ~पत्रकार जगदीश कुलकर्णी 

कोळा

Post a Comment

0 Comments