पंढपुरात अल्पवयीन बालकाचा खून की आणखी काही ? प्रचंड खळबळ आणि तर्कवितर्क !
पंढरपूर येथे सार्वजनिक शौचालयात एका बालकाचा अत्यंत वाईट अवस्थेत एक मृतदेह आढळून आला असून हा खून आहे, घातपात आहे की आणखी काही आहे हा मात्र एक मोठा प्रश्न बनला असून पोलीस तपासानंतरच याबाबत उलगडा होणार आहे.
पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील महात्मा फुले चौकाच्या जवळच असलेल्या एका सार्वजनिक शौचालयात काल मध्यरात्री एका मुलाचा मृतदेह आढळून आला आणि रात्रीच्या अंधारात देखील या परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ७ ते १० वर्षे वयाच्या या मुलाच्या मृतदेहाची अवस्था देखील अत्यंत वेदनादायी होती.
मृत्युमुखी पडल्लेया या मुलाची ओळख देखील पटली असून कृष्णा तम्मा धोत्रे असे त्याचे नाव आहे. मृतदेहाचे पोट पूर्णपणे फाडून टाकलेले आहे. ही अवस्था पाहता या बालकाचा खून झाल्याची शंका अनेकांना येत असून त्याच्या कुटुंबीयांनी देखील असाच संशय व्यक्त केला आहे त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
सदर बालकाचे पोट मोकाट जनावरांनी फाडल्याची शक्यता काहींनी व्यक्त केली परंतु या शक्यतेला आधार मिळत नाही. गजबजलेल्या परिसरात जनावरांनी हल्ला केला असता तर तो आजूबाजूच्या लोकांच्या वेळीच लक्षात आला असता. शिवाय त्याचा मृतदेह हा सार्वजनिक शौचालयात आढळून आला आहे.
बालकाच्या नातेवाईकाकडून मात्र हा खुनाचा प्रकार असल्याचे म्हटले गेले आहे. या एकंदर घटनेने आधी संतपेठ परिसरात आणि नंतर मात्र संपूर्ण शहरात खळबळ आणि चर्चेचा विषय बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळे अंदाज व्यक्त होत असले तरी पोलिसांच्या तपासात या घटनेतील सत्य समोर येणार आहेच
परंतु एकूण परिस्थिती लक्षात घेता हा खून असण्याचीच अधिक शक्यता व्यक्त होत आहे, शिवाय बालकाच्या कुटुंबाने देखील हा खून असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे प्रकरण गूढ आणि रहस्यमय बनले असून पोलिसांच्या तपासात आणि वैद्यकीय अहवालात काय समोर येतेय याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
0 Comments