पुणे हादरले! जिवलग मित्रानेच केला मित्राचा घात
पुण्यातील महाळूंगेत जिगरी मित्रानेच किरकोळ वादातून तरुणाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत केवळ चार तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
परंतु आधी कोयता गँगची दहशत आणि त्यानंतर हत्येच्या घटनेने पुण्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दीपक राठोड असे मृत तरुणाचे तर विठ्ठल चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी विठ्ठल आणि त्याचा मित्र दीपक हे एकाच रुमवर राहत होते. संध्याकाळी मद्य प्राशन केल्यानंतर दोघांनी एकाच हॉटेलमध्ये एकत्र बसून चायनीजवर ताव मारला. जेवण करत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर संतापलेल्या विठ्ठलने दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. दीपकचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समजताच विठ्ठलने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर परिसरात मर्डर झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली.
0 Comments