google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाचशे रुपयांसाठी व्यावसायिकाचा खून

Breaking News

पाचशे रुपयांसाठी व्यावसायिकाचा खून

 

पाचशे रुपयांसाठी व्यावसायिकाचा खून


पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून हादरून टाकणारी बातमी आहे. अवघ्या पाचशे रुपयासाठी एका गॅरेज कामगाराने टुरिस्ट व्यावसायिकाची हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वत:लाही वार केले. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 असून आरोपीला तत्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतोष गोडसे (वय, ४२) असे हत्या झालेल्या व्यावसायकाचे नाव आहे. मयुर सोमवंशी असे आरोपीचे नाव आहे. संतोषने त्याची गाडी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. 

गाडी दुरुस्तीसाठी एकूण ७ हजार ६०० खर्च झाला. त्यावेळी संतोषने ७ हजार १०० रुपये रोख देऊन पाचशे रुपये नंतर देतो, असे गॅरज कामगार मयुरला सांगितले. उर्वरित रुपये रुपयांसाठी मयुरने संतोषकडे फोनवरून सारखा तगादा लावला.

 दरम्यान, काल संध्याकाळी मयुरने संतोषला फोनवरून शिवीगाळ केली. तू गॅरेजवर ये, मग तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर संतोष गॅरेजमध्ये पोहचला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मयुरने संतोषच्या छातीत चाकू भोसकून स्वत:वर वार करून घेतले. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

0 Comments