मुंबईचा भूषण तांबे ठरला राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा मानकरी
सांगोला प्रतिनिधी समाधान मोरे
मुंबई: काही दिवसांपूर्वीचं अभिजीत राणे युथ फाऊंडेशनच्या वतीने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत मुंबईच्या भूषण तांबे यांना विशेष प्राविण्य मिळविण्यास यश आले. याच स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दि.२४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
युथ फाऊंडेशनचे संस्थापक माननीय श्री.अभिजीत राणे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छान आयोजन केले. सर्व मान्यवरांना उत्तेजित करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी माननीय श्री.अभिजीत राणे यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
स्पर्धेतील विजेत्या मान्यवरांना या बक्षीस समारंभ कार्यक्रमात आमंत्रित करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातून सर्व क्षेत्रातील कला, क्रीडा, साहित्य, आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साहित्यिक मान्यवरांचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या पुढील वाटचालींसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि पत्रकार अशी भूषण सहदेव तांबे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके तसेच दिवाळी अंकांसाठी त्यांचे साहित्य आवर्जून प्रकाशित केले जाते.
भूषण सहदेव तांबे यांचे साहित्य महाराष्ट्रातच मर्यादित राहिले नसून गोवा ते थेट अमेरिकेत प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकांमध्ये देखील त्यांचे साहित्य आवर्जून प्रकाशित केले जाते.
भूषण सहदेव तांबे यांना मिळालेला हा पुरस्कार नक्कीच त्यांना उत्तेजना देईल आणि त्यांचे पुढील साहित्य लोकार्पणासाठी लवकरात लवकर सज्ज होईल असे त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले आहे.
--प्रदीप बडदे, (नवी मुंबई)


0 Comments