google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मध्यस्थीने रेल रोको आंदोलन स्थगित. कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी रेल्वेस लवकरच थांबा मंजूर होणार:- शहीद कामटे संघटना

Breaking News

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मध्यस्थीने रेल रोको आंदोलन स्थगित. कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी रेल्वेस लवकरच थांबा मंजूर होणार:- शहीद कामटे संघटना

 आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मध्यस्थीने रेल रोको आंदोलन स्थगित.

कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी रेल्वेस लवकरच थांबा मंजूर होणार:- शहीद कामटे संघटना

सांगोला (प्रतिनिधी)26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी अशोक कामटे संघटना सांगोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते.

22155&22156 कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी या गाडीस सांगोल्यात थांबा मिळत नसल्याने शहीद अशोक कामटे संघटनेने रेल्वेच्या सर्व विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता पण प्रशासन दाद देत नव्हते अखेर आज  विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक संगीता हत्ती मॅडम यांनी या प्रश्न लक्ष घालून वरिष्ठ कार्यालयास तसा सूचना दिल्या.

 त्याचबरोबर सांगोल्याचे आमदार एडवोकेट शहाजीबापू पाटील यांनी या मागणीची बैठक दिल्ली दरबारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी ,खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या उपस्थितीत घेण्याची भ्रमणध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

 यावेळी रेल्वेच्या अनेक समस्या बाळासाहेब सावंत ,नीलकंठ शिंदे सर ,चारुदत्त खडतरे यांनी प्रशासनासमोर मांडल्या त्याचे तात्काळ निवारण करण्यात येईल असे आश्वासन शहीद अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना रेल्वे  विभागामार्फत देण्यात आले.

Post a Comment

0 Comments