वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन
सांगोला (प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित, वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले.
सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेत समुह गीते व भाषणे सादर केली. मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबर मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, श्रीमती गीताबाई बनकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मार्गदर्शक प्राध्यापिका व त्यांच्या बी. एड्च्या प्रशिक्षणार्थी तसेच विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. आभार प्रदर्शन बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केले.
0 Comments