google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आजचे विद्यार्थी भारताचे उद्याचे खरे शिल्पकार:- सूर्यकांत भिसे

Breaking News

आजचे विद्यार्थी भारताचे उद्याचे खरे शिल्पकार:- सूर्यकांत भिसे

 आजचे विद्यार्थी भारताचे उद्याचे खरे शिल्पकार:- सूर्यकांत भिसे

वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयाचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण संपन्न.

सांगोला (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पालक व शिक्षक प्रयत्न करीत असतात ,विद्यार्थ्यांच्या सप्त कलागुणांना वाव मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शिक्षण होय.आजचे विद्यार्थी भारताचे उद्याचे खरे शिल्पकार आहेत. 

भौतिक विकासाबरोबर शारीरिक सामाजिक ,सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे असते तर त्या विद्यार्थ्यांचे जीवन आनंददायी बनते असे विचार भागवत धर्म प्रसारक समितीचे राज्याध्यक्ष, पत्रकार सूर्यकांत भिसे वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.

येथील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय दि 11 जानेवारी ते 13 जानेवारी या दिवसात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संस्थापक वामनराव शिंदेसाहेब व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 पारितोषिक वितरण सोहळा संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,सचिव नीलकंठ शिंदे सर, विद्यार्थी प्रतिनिधी विराज राऊत ,तालुका क्रीडा  अध्यक्ष सुनील भोरे सर प्रशांत राजमाने, प्रफुल देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थित हा सन्मान सोहळा पार पडला. 

सूर्यकांत भिसे यांची 'भटक्यांची भटकंती' पुस्तक प्रशालेस भेट देण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष कुंभार सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी नियोजन सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments