मंगळवेढा येथे २० जानेवारीला होणार जप्त वाळू साठ्याचा लिलाव
सोलापूर:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी दिली आहे.
सांगोला तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे 14 ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू साठा तहसिलदार निवासस्थान, सांगोला येथे ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची अपसेट किंमत सुमारे 8 हजार 400 रुपये इतकी आहे.
ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी.
तसेच लिलावात भाग घेण्यासाठी बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, उपविभाग विभाग मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी समिंदर यांनी सांगितले.
सदर लिलावात भाग घेण्यासाठी 25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये 2 हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.
बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री. समिंदर यांनी केले आहे.
0 Comments