google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना.. चिमुकल्या दोन मुलांसह पित्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

Breaking News

दुर्दैवी घटना.. चिमुकल्या दोन मुलांसह पित्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

दुर्दैवी घटना.. चिमुकल्या दोन मुलांसह पित्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

आपल्या दोन मुलांसह पित्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली असून सोलापूर जिल्ह्यात या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

आळंद येथील शरणनगरमधील ३७ वर्षे वयाचे किरणा दुकानादार सिद्धारूढ महामलप्पा अक्का यांनी आपल्या बारा आणि दहा वर्षांच्या दोन मुलांसह एका विहिरीत उडी घेवून तिघांच्याही जीवनाचा शेवट केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. 

आळंद बस आगाराजवळ असलेल्या एका विहिरीत सिद्धारूढ यांच्यासह बारा वर्षे वयाचा मनीष आणि दहा वर्षे वयाची श्रेया यांचे मृतदेह आढळून आले आहेत. 

सिद्धारूढ अक्का हे आपल्या दोन्ही मुलांना शाळेतून आणण्यासाठी म्हणून गेले होते ते परत आलेच नाहीत आणि मुलांसह ते बेपत्ता होते. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान आळंद बस आगाराच्या जवळ असलेल्या एका विहिरीजवळ चप्पल पडली असल्याचे दिसून आले.

सदर विहिरीत अग्निशामक दलाच्या मदतीने शोध घेतला असता विहिरीत मनीष आणि श्रेया या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. पिता सिद्धारूढ अक्का यांचा मात्र काही तपास लागत नव्हता. अखेर विहिरीचे संपूर्ण पाणी उपसण्यात आले 

आणि त्यानंतर त्यांचाही मृतदेह विहिरीत आढळून आला. अचानक पित्याने हे मोठे आणि टोकाचे पाऊल कशासाठी उचलले याचे नेमके कारण समोर आले नाही परंतु पत्नीच्या आजारपणामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे हा प्रकार केला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.

 एकावेळी एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून सिद्धारूढ यांच्या पत्नी संगीता यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments