वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात आंतर शालेय विविध क्रीडा स्पर्धा संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आंतर शालेय विविध क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित,वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 अंतर्गत दि. 22 डिसेंबर 2022ते 05 जानेवारी 2023या कालावधीत आंतर शालेय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते असे प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी सांगितले.
यामध्ये पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास व्हावा तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रेरणा मिळावी म्हणून या स्पर्धांचे आयोजन केले होते.
यामध्ये १०० मी. धावणे, निबंध लेखन,रांगोळी , हस्तकला दालन ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा खो-खो ,कबड्डी च्या स्पर्धा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्फुर्तपणे प्रतिसाद नोंदविला व खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
सर्व स्पर्धा व सामने व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी आपापली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभ 13 जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याचे माहिती दिली. शेवटी यामधूनच कोणीतरी एखादा चांगला खेळाडू तयार होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
0 Comments