आराम बस आणि ट्रक यांच्यातील अपघातात दहा प्रवासी ठार !
मालट्रक आणि खाजगी बस यांच्यात झालेल्या भयानक अपघातात दहा जण जागीच ठार झाले असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रक आणि खाजगी आराम बस यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात घडला आहे.
नाशिक जवळ शिर्डी - सिन्नर महामार्गावर पाथरे परिसरात हा अत्यंत भीषण आणि भयानक अपघात झाला आहे. अपघात सतत होत असले तरी या अपघाताची भीषणता खूपच म ओठी आहे. मुंबईकडून शिर्डीकडे निघालेल्या खाजगी आराम बसचा आणि शिर्डीकडून सिन्नरच्या दिशेने निघालेल्या मालट्रक यांच्यात जोराची धक्दक झाली.
पाथरे ते पिंपळवाडी दरम्यान एकेरी वाहतूक सुरु असून या ठिकाणी हा अपघात झाला आहे. आराम बसमधून पन्नास प्रवासी प्रवास करीत होते आणि हे प्रवासी अंबरनाथ, ठाणे परिसरातील आहेत.
या अपघातात दहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून यात ८ महिला तर दोन मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० प्रवासी या अपघातात जखमी झाले असून त्यांची अवस्था पाहता मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार देखील सुरु झाले आहेत. उल्हासनगर येथून साई दर्शनासाठी पंधरा बस शिर्डीकडे इघाल्या होत्या आणि यातील एका बसचा हा अपघात आहे, गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीची ही बस असून मृतांची ओळख पटण्यास विलंब लागत आहे,
पंधरा बसमधून निघालेल्या प्रवाशाची बसनिहाय यादी आहे परंतु वाटेत चहा घेण्यासाठी थांबल्यानंतर काही प्रवाशांनी बस बदलल्या होत्या त्यामुळे यादीनुसार ही ओळख पटवणे चुकीचे ठरणार आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी आराम बसचा चक्काचूर झालेला आहे. अत्यंत भयावह आणि थरारक असा हा अपघात झाला आहे.


0 Comments