google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील घटना....पाच वर्षाच्या बालिकेवर अल्पवयीन १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील घटना....पाच वर्षाच्या बालिकेवर अल्पवयीन १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार !

 सोलापूर जिल्ह्यातील घटना....पाच वर्षाच्या बालिकेवर अल्पवयीन १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार !

 सोलापूर: अवघ्या पाच वर्षे वयाच्या कोवळ्या बालिकेवर सतरा वर्षे वयाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संताप आणणारी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून समाजात काय चाललेय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

अलीकडे लैंगिक अत्याचाराच्या घटना वेगाने वाढत आहेत. समाजात नैतिकता तर आता केवळ नावापुरती उरलेली असल्याचे दिसत असून महिलांविषयक कायदे कडक असतानाही लैंगिक अत्याचाराचा घटना वाढताना दिसत आहेत. 

अशा घटनात नराधमांना न्यायालयातून शिक्षाही होत आहे तरीही समाजात वाढत असलेल्या अशा घटना चिंताजनक बनू लागल्या आहेत. महिला, मुली या तर समाजात असुरक्षित बनत आहेत पण लहानग्या चिमुरड्यांना देखील नराधम लक्ष्य बनवत आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयात देखील त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होऊ लागले आहेत 

त्यामुळे पालकांत तर कमालीची चिंता आणि भीती व्यक्त होत आहे. लहान चिमुरड्या मुली खेळायला अंगणात गेल्या तरी आई वडिलांना चिंता वाटू लागली आहे. बार्शी तालुक्यातील एका गावात असाच अमानवी प्रकार घडला असून संताप व्यक्त केला जात आहे.

भर दुपारी आई घरातील फरशी पुसण्याचे काम करीत असताना केवळ ४ वर्षे ९ महिने वय असलेली पीडित चिमुरडीबालिका आणि तिची एक मैत्रीण अंगणात खेळ खेळण्यात मग्न होते. यावेळी एका १७ वर्षे वयाच्या नराधमाने 'भाजीपाला आणायला चल' म्हणत तिला तेथे जवळच असलेल्या एका बाथरूममध्ये नेले. 

तिच्या मैत्रिणीला बाथरूमच्या बाहेर उभे केले आणि या कोवळ्या अजाण बालिकेला बाथरूममध्ये घेवून गेला. तेथे तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करून हा राक्षस निघून गेला पण ही कोवळी मुलगी बाथरूममध्येच रडत राहिली.

 बाहेर असलेल्या तिच्या मैत्रिणीला तिच्या रडण्याचा आवाज आला आणि ती देखील घाबरून गेली. कशामुळे रडतेय हे समजण्याचे तिचेही वय नव्हते. पिडीत बालिकेच्या मैत्रिणीने पिडीतेच्या आईकडे धाव घेतली आणि पिडीत बालिका रडत असल्याची माहिती दिली.

आईला माहिती मिळताच आई धावत त्या बाथरूमकडे गेली आणि रडणाऱ्या बालिकेची चौकशी केली. तेंव्हा सदर पिडीत बालिकेने घडलेला एकूण प्रकार आईला सांगितला. मुलीने रडत सांगितलेली कथा ऐकून आईला मोठा धक्का बसला. घाबरून गेलेल्या आईने हा धक्कादायक प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे लगेच पोलिसात धाव घेतली. 

पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सदर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.  सोलापूर येथील बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली. या घटनेने मात्र परिसर हादरून गेला असून चिमुरड्या मुलींवर देखील लक्ष ठेवण्याची वेळ आली असलाने पालकांत मोठी घबराट आणि चिंता व्यक्त होवू लागली आहे.

Post a Comment

0 Comments