google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?

Breaking News

सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?

 सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?

सातारा (प्रतिनिधी)- लावणी कलाकार गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. सध्या गौतमी पाटील विविध कारणांमुळे प्रचंड गाजत आहे. तिच्या नृत्याचे तसेच तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. मात्र, लावणी कलाकार गौतमी अडचणीत आली आहे. कारण सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप बऱ्याच लोकांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्याच बरोबर मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली होती.

 त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप फेटाळला आहे. लोकांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझे कार्यक्रम बघतात. माझ्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित असतात. 

मी गावोगावी जाऊन माझी कला सादर करते; असेही गौतमी पाटील म्हणाली होती. तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची हुल्लडबाजी सातत्याने पाहायला मिळते आहे. म्हणूनच पुन्हा एकदा तक्रार दाखल करण्यात आली होती. कदाचित गाैतमीला अटक देखील होऊ शकते.

अश्लील हावभाव करणे, नागरिकांना घाणेरडे हावभाव करणे, शॉर्ट कपडे घालणे हे प्रकार लोककलेत आणि लावणीत येत नाहीत. पण काही जण झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्लील नृत्य करण्याला प्राधान्य देतात आणि लोककलावंत म्हणून स्वतःची ओळख करून देतात असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला.

Post a Comment

0 Comments