मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे सरकारचा शपथविधी घटनाबाह्य
शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यानंतर शिंदे गट व भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र आता नव्या सरकारचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचे समोर आले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच राजभवनकडून नुकत्याच दिलेल्या माहिती अधिकारात समोर आली आहे. राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली,
ही शपथच बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकीकडे सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दुसरीकडे माहिती अधिकारात राजभवनकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे.


0 Comments