आसाराम बापूला कोर्टाचा सर्वात मोठा दणका! बहिणींच्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा
गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला सन २०१३मध्ये दाखल झालेल्या महिला शिष्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणात आसाराम बापूशिवाय त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि इतर चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला,जस्सी आणि मीरा यांनाही आरोपी ठरवण्यात आलं आहे. आसाराम यांना व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने आसाराम बापूला दोषी ठरवलं.
आसाराम बापू बलात्काराच्या आणकी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. जोधपूर इथे तो तुरुंगवास भोगतोय. याआधी आसाराम बापूच्यावतीने कोर्टात जामीनासाठी याचिका करण्यात आली होती. पण कोर्टाने ती फेटाळली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली होती. वाढतं वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे जामीन मिळावा अशी बाजू आसाराम बापूच्यावतीने मांडण्यात आली होती. पण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली


0 Comments