google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अशोक कामटे संघटनेच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी.

Breaking News

अशोक कामटे संघटनेच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी.

 अशोक कामटे संघटनेच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी.

सांगोला (प्रतिनिधी)सांगोला शहर व परिसरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त मंडलाधिकारी बाबुराव लाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी बोलताना बाबुराव लाडे म्हणाले शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गांधीजींनी केले त्यांचे दुःख दूर केले .

कस्तुरबा गांधींकडून भारत छोडो आंदोलनाची प्रेरणा घेतली आणि इंग्रजाविरुद्ध लढा उभा केला .माणसात देव पाहणारा तोच खरा माणूस. हा देश शेतकरी कष्टकरी सामान्यांचा आहे त्यासाठी त्यांचा सन्मान करा असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर आभार अमोल शिनगारे यांनी मानले यावेळी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व सदस्यांनी गांधींना अभिवादन करून फुले वाहिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments