google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अंगावर काटा आणणारा भयंकर एक अपघात आणि तो उडाला उंच आकाशात !

Breaking News

अंगावर काटा आणणारा भयंकर एक अपघात आणि तो उडाला उंच आकाशात !

 अंगावर काटा आणणारा भयंकर एक अपघात आणि तो उडाला उंच आकाशात !

 अपघाताचे अनेक थरारक व्हिडीओ समाजमाध्यमांवर पाहायला मिळत असतात परंतु एक अत्यंत थरारक व्हिडीओ व्हायरल होत असून असा अपघात शक्यतो कधी पहाण्यात आलेला नसेल !

अलीकडे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले असून अत्यंत थरारक आणि काळीज भेदणारे अपघात होत असतात. साधा अपघात झाला तरी त्यात एक दोन जीव गेलेले असतात. 

हल्ली प्रत्येकाला भलतीच घाई झाली असून माणसांच्या प्राणाची किमंत उरलेली दिसत नाही आणि कुणी स्वत:च्याच जीवाची पर्वा करताना दिसत नाही तिथे दुसऱ्याच्या जीवाची काळजी कोण करणार ? गरज म्हणून चांगले रस्ते तयार झालेत, पूर्वीपेक्षा रस्ते रुंद देखील झाले

 परंतु यामुळे वाहनांचे वेग वाढले असून त्यातूनच अपघातांची संख्या अमर्याद वाढली आहे. माणसांच्या संवेदनाही बोथट झाल्या असून अपघातात तडफडत पडलेला जखमी माणूस पाहूनही कुणाच्या गाड्यांना ब्रेक लागत नाही की कुणाची माणुसकी जागी होत नाही. अपघात हा कुठलाही असला तरी तो भयावहच असतो. 

त्याचे व्हिडीओ अलीकडे सोशल मीडियावरून पाहायला  मिळतात. अनेक प्रकारचे व्हिडीओ पहायाला मिळतात तसे थरारक अपघाताचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आता मात्र असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की हा अपघात पाहताना श्वास रोखला जात आहे. 

अंगावर काटा आणणारा हा अपघात आणि त्याचा प्रत्यक्ष थरार या व्हिडीओमधून प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे.

 महामार्गावरील हा अपघात असून केवळ ९ सेकंद असणारा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहिला जात आहे. रस्त्यावरून अनेक वाहने धावत आहेत आणि अशातच दोन वाहनांची थरारक टक्कर होते. जोराची धडक झाल्यावर वाहनातील व्यक्ती जखमी होवून गाडीतच अडकून पडतो असा आजवरचा अनुभव आहे. या अपघातात मात्र वेगळे घडले आहे. 

वाहनांची जोरदार टक्कर झाल्यानंतर गाडीही हवेत उडते पण त्यापेक्षाही अधिक उंचीवर गाडीतील व्यक्ती उडतो. जमिनीवर झालेल्या या अपघातातील व्यक्ती उंच आकाशात उडताना दिसतो. या घटनेचे चित्रण झाले नसते तर यावर कुणाचा विश्वासही बसला नसता. खाली गाडीचा चक्काचूर होतो आणि गाडीतील व्यक्ती आकाशांत उंच हवेत उडताना दिसून येत आहे. 

प्रवास करताना सीटबेल्ट लावण्याची कायद्याने सक्ती केली आहे पण सहसा हा कायदा मोडण्याची इच्छा असणारेच अधिक दिसतात. या अपघातात सीटबेल्ट लावला गेला असता तर हा व्यक्ती हवेत उडाला नसता. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आता सीटबेल्टचे महत्व पटू लागले आहे.  काळजी तर घेतलीच पाहिजे पण हा व्हिडीओ आणि अपघात अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. पहा हा व्हिडीओ ... थरारक !

Post a Comment

0 Comments