सांगोला- अचकदानी दळण आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला भरधाव जाणाऱ्या दुचाकीने समोरून धडक उपचारांदरम्यान मृत्यू
पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी निघालेल्या तरुणास भरधाव जाणाऱ्या दुचाकीने समोरून धडक दिल्याने डोक्याला मार लागून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात लक्ष्मीनगर ते अचकदाणी (ता. सांगोला) रोडवर घडला होता. रणजित शंकर शिंदे (वय २९ रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) असे अपघातामध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दुचाकीस्वार काशिलिंग ज्योतिबा बंडगर (रा. कटफळ, ता. सांगोला) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रणजीत शिंदे हा राहत्या घरातून दुचाकी (एम एचअचकदाणी गावाकडे निघाला होता. त्यावेळेस अचकदाणी गावाकडून लक्ष्मीनगरकडे भरधाव येणाऱ्या दुचाकी (एमएच. ४५. ए. एस. २६९६) ने रणजित शिंदे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये रणजित यांच्या डोक्यास मार लागला होता.
अपघातानंतर जखमी रणजित शिंदे यास तातडीने उपचारांकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे पुढील उपचारांकरिता तत्काळ सोलापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले होते. सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचारां दरम्यान रणजित शिंदे यांचा मृत्यू झाला.


0 Comments