सांगोला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविणार जयमालाताई गायकवाड; गावभेट दौऱ्यात महिलांशी साधला संवाद
सांगोला : महिला बचत गटाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील महिलांना सक्षम बनवून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणार आहे. महिलांना उद्योजक बनवायचे स्वप्न उरी बाळगले आहे. तालुक्यामध्ये प्रत्येक गावांमधील बचत गटातील महिलांना एकत्रित करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंदा उभा करण्यासाठी असणाऱ्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस गायकवाड यांनी केले.
याकरीता संपूर्ण सांगोला महिला उपाध्यक्ष जयमालाताई
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्षा व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या गाव भेट दौन्यामध्ये वाटंबरे, अनकढाळ, राजुरी, उदनवाडी, जुजारपूर व जुनोनी या गावाचा गाव भेट
पाचेगाव, हातीद, ह. मंगेवाडी,
दौरा पार पडला. त्यामध्ये गावातीलबचत गटाच्या महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत फोनवर संवाद साधून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून लोकांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न या गाव भेट दौऱ्यामध्ये सुटले जात आहेत.
खेड्यातील अनेक होतकरू महिला आहेत की ज्यांना उद्योगांमध्ये उभे राहायचे आहे. पण मार्केटिंग उपलब्ध नसल्यामुळे त्या उद्योगधंदे करण्यास नकार देत आहे.
पण मी अशा सर्व रणरागिनींना सांगते की तुम्ही फक्त उत्कृष्ट असेप्रॉडक्ट बनवा. तुमच्या मार्केटिंग हमी मी घेते. तुमच्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी असल्या सांगीतले.
यावेळी सांगोला तालुका राष्ट्रवाद काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रे पार्टीच्या नेत्या मनीषा मिसाळ, पा गावचे माजी सरपंच संतोष पाटील संभाजी हरिहर तसेच दौऱ्यातील प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, बच गटाच्या अध्यक्षा, सचिव, लिपिक प्रत्यक्ष बचत गटांमध्ये काम करणार महिला व गावातील नागरिक मोठ प्रमाणावर उपस्थित होते.


0 Comments