google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय विविध पुरस्कार २०२२-२३ करीता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

Breaking News

राज्यस्तरीय विविध पुरस्कार २०२२-२३ करीता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

 राज्यस्तरीय विविध पुरस्कार २०२२-२३ करीता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

सांगोला:- सीबीएस न्युज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्य  आयोजित राज्यस्तरीय आदर्श सेवारत्न  पुरस्कार वितरण सोहळा व महासंमेलन- २०२३ साठी सबंध महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या पुरस्कारासाठी राज्यातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस  आशाताई यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, डॉक्टर, नर्स, वकील, पत्रकार, महावितरण कर्मचारी,महानगरपालिका कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, 

पोस्ट कर्मचारी अशा सर्व श्रेणीतील व संवर्गातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर, विचारवंत, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

या सोहळ्यात पुरस्कारार्थिना विशेष मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, फेटा, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीचा हा पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम सांगोला शहरात संपन्न होणार आहे, अशी माहिती सीबीएस न्युज मराठी संयोजक मंडळ कडून देण्यात  आली आहे.

 या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी 9922570896 या क्रमांकावर chandshekh78656@gmail.com या ईमेल वर संपर्क करावा विशेषतः १५ जानेवारी २०२३पर्यंत प्रस्ताव स्विकारले जातील त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावावर विचार केला जाणार नाही.असे आवाहन सीबीएस न्युज मराठी कडून करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments